Vicky and Katrina Wedding: विकी आणि कतरिनाच्या "लग्न सोहळ्यात 120 पाहुणे सहभागी होणार
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची बातमी समोर आली आहे आणि तेव्हापासून ती चर्चेत आहे. दोघांच्या लग्नाबाबत सातत्याने काही अपडेट्स समोर येत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी लग्नाला उपस्थित राहण्याची पुष्टी केली आहे.शाहरुख खान या लग्नाला उपिस्थत राहणार नसल्याचे वृत्त मिळाले आहे.
अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ या जोडीच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. या दोघांनीही याला दुजोरा दिलेला नाही. मात्र, राजस्थानात प्रशासनानं या दोन्ही सेलिब्रिटींच्या लग्नासाठी कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
विकी आणि कतरिना 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये विवाहबद्ध होणार आहेत.हे जोडपे स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत कोर्ट मॅरेज करणार आहेत.
सूत्रानुसार, 10 डिसेंबरला एक छोटासा कार्यक्रम असून त्यानंतर विकी आणि कतरिना रणथंबोरहून निघणार आहेत. मात्र, त्याचे कुटुंबीय अद्याप आलेले नाहीत. तेही 6 डिसेंबरला येतील. लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.
लग्नाचा सोहळा 7 ते 10 डिसेंबरपर्यंत चालणार आणि त्यात 120 पाहुणे उपस्थित असणार, ,या सोहळ्यात बॉलिवूडसह उद्योग जगत आणि राजकारणाशी संबंधित बड्या हस्तीही सहभागी होतील,असं त्यांनी सांगितलं. या दरम्यान कोरोनाबाबतची काळजी घेतली जाईल, अशी माहितीही देण्यात आली.मात्र, पाहुण्यांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.