1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जुलै 2025 (11:58 IST)

प्रसिद्ध अभिनेते रवी तेजा यांच्या वडिलांचे निधन

Shradhanjali RIP
प्रसिद्ध अभिनेते रवी तेजा यांच्या वडिलांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याचे वडील भूपतिराजू राजगोपाल राजू यांनी हैदराबाद येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. ही दुःखद बातमी येताच साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
रवी तेजाचे वडील भूपतिराजू राज गोपाल राजू हे व्यवसायाने फार्मासिस्ट होते. त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडत असे आणि ते साधे जीवन जगत होते. भूपतिराजू राजगोपाल राजू यांच्या पश्चात पत्नी राज्यलक्ष्मी आणि दोन मुले रवी तेजा आणि रघू राजू आहेत.
भूपतिराजू राजगोपाल राजू हे आंध्र प्रदेशातील जग्गमपेटा येथील रहिवासी होते. आता त्यांच्या निधनाने कुटुंबावरून वडिलांचा आधार हरपला आहे. युजर्स श्रद्धांजली वाहत आहे. 
Edited By - Priya Dixit