शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

चीनमध्ये चार दिवसांत 'दंगल'ची 100 कोटींपेक्षा जास्त कमाई

dangal in china

आमीर खानच्या 'दंगल' चित्रपटाने चीनच्या बॉक्स ऑफिसवर अवघ्या चार दिवसांत 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. गेल्या शुक्रवारी चीनमध्ये दंगल प्रदर्शीत झाला होता. 5 मे 2017 रोजी दंगल शुआई जिआओ बाबा (बाबा, चला कुस्ती खेळू) या नावाने चीनमध्ये प्रदर्शित झाला. सात हजार स्क्रीन्सवर झळकलेल्या या चित्रपटाने मंगळवारपर्यंत 121 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटकरून याबाबत माहिती दिली. चीनमध्ये पहिल्या दिवशी दंगलने जवळपास 15 कोटींची कमाई केली.  याआधी आमीर खानचा पीके ने चीनमध्ये 100 कोटींची कमाई करणारा पहिला बॉलिवूडपट होता. 2015 मध्ये चीनमध्ये 16 दिवसात पीकेने 100 कोटी जमवले होते. मात्र दंगलने अवघ्या चार दिवसांत हा आकडा गाठला.