सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 10 जुलै 2022 (10:46 IST)

Darlings Teaser : आलिया भट्टच्या डार्लिंग्स चित्रपटाचा टीझर रिलीज

Darlings Teaser: आलिया भट्टचा आगामी चित्रपट डार्लिंग्सचा टीझर रिलीज झाला आहे.बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती आणि प्रत्येकाला हा चित्रपट कोणत्या प्रकारचा आहे हे जाणून घ्यायचे होते.टीझरची सुरुवात आलिया आणि विजय वर्माने होते.दोघे एकमेकांना भेटतात आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात.शेफाली शाहने आलियाच्या आईची भूमिका साकारली आहे आणि त्यानंतर आईच्या आशीर्वादाने दोघे लग्न करतात.पण त्यांची कथा इथेच संपत नाही तर इथूनच चित्रपटाची खरी कहाणी सुरू होते.
 
टीझरमध्ये, आलियाने तिची आणि विजयची बेडूक आणि विंचूशी तुलना केल्याची कहाणी तुम्हाला दिसेल. यासोबतच, लग्नानंतर विजयला आलियावर संशय येऊ लागला की त्याचे कोणाशी तरी विवाहबाह्य संबंध आहेत. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आलियाचा वेगळा अवतार पाहायला मिळेल.
 
चाहत्यांना ते आवडले
व्हिडिओ शेअर करताना आलियाने लिहिले की,आम्ही 5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर येत आहोत.'आलियाचा हा टीझर चाहत्यांना खूप आवडला आहे.आलियाचा अभिनय आणि चित्रपटाच्या कथेने प्रत्येकजण प्रभावित झाल्याचे दिसत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt