शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (11:33 IST)

डिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता

दीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर आले आहे. स्कोर ट्रेंडस्‌ इंडियाच्या अनुसार, डिजिटल न्यूज चार्टवर सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 ह्या वर्षात सर्वाधिक जास्त सलमान आणि दीपिका पदुकोणच अव्वलस्थानी असल्याचे दिसत आहे. स्कोर ट्रेंडस्‌ इंडियाद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या वार्षिक अहवालानुसार, सलमान 52 आठवड्यात प्रथम क्रमांकावर होता. तर दुसर्‍या स्थानावर किंग खान शाहरुख, तिसर्‍या स्थानी अमिताभ बच्चन, अक्षयकुमार चौथ्या आणि रणवीर सिंह पाचव्या स्थानी होते. त्याचप्रमाणे दीपिका 52 आठवड्यांमध्ये पहिल्या स्थानी, दुसर्‍या क्रमांकावर प्रियांका चोप्रा, तिसर्‍या स्थानी सोनम कपूर, आलिया भट्ट चौथ्या आणि अनुष्का शर्मा पाचव्या क्रमांकावर होत्या. लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित अमेरिकेच्या स्कोर ट्रेंडस्‌ इंडिया ह्या मीडिया-टेक कंपनीची ही यादी आहे. स्कोर ट्रेंडस्‌चे सह-संस्थापक अश्विनी कौल सांगतात, समोर आलेल्या आकड्यांच्यानुसार, 52 आठवड्यांमध्ये, दीपिकाच्या लोकप्रियतेत पद्मावत आणि तिच्या लग्नाविषयीच्या सतत चर्चेत असलेल्या बातम्यामुंळे वाढ झाली. तर सलमान खान बिग बॉस, टायगर जिंदा है, रेस 3 आणि भारत या चित्रपटामुंळे लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला.