रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (13:58 IST)

दीपिका रणवीर एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले

deepika ranveer
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरात आनंद आला आहे.अभिनेत्री दीपिका ने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ते एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले आहे. गणेश चतुर्थी सणाच्या दुसऱ्या दिवशी दाम्पत्याच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. दीपिका पदुकोणची डिलिव्हरी 28 सप्टेंबरला होणार असल्याचे वृत्तात समजले होते .पण, आता त्यांच्या घरी आज 8 सप्टेंबर रोजी एका मुलीचा जन्म झाला.
 
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली. तेव्हापासून अभिनेत्री प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. गरोदरपणात तिने तिच्या फिटनेस आणि डाएटची पूर्ण काळजी घेतली आणि चाहत्यांना  देखील त्याबद्दल जागरूकही केले. 
 
दीपिका पदुकोण आणि रणवीरच्या घरी त्यांच्या मुलीच्या आगमनाची बातमी ऐकल्यानंतर चाहते शुभेच्छा देत आहे. दीपिका आणि रणवीर शनिवारी रूग्णालयात जाताना दिसले. तेव्हा पासूनच चाहते गोड बातमीची वाट बघत होते. आज रविवारी दोघांनी आई बाबा बनून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

ही आनंदाची बातमी मिळताच चाहत्यांनी या जोडप्याचे पालक झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. आई आणि मुलगी कशी आहेत हेही त्यांना जाणून घ्यायचे आहे. आता चाहत्यांना गोंडस परीला बघण्याची उत्सुकता आहे. 

प्रसूतीच्या दोन दिवस आधी दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगसोबत सिद्धिविनायक मंदिरात गेली होती. या जोडप्याने तेथे बाप्पाचे आशीर्वाद घेतले. रणवीर आणि दीपिका पदुकोण 2018 साली विवाहबद्ध झाले. लग्नाच्या जवळपास सहा वर्षानंतर या जोडप्याने आपल्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले आहे.
Edited By - Priya Dixit