शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (10:27 IST)

'ढगाला लागली कळ' नव्या रूपात

dhagala lagali kal
'ड्रीमगर्ल' चित्रपटातील 'ढगाला लागली कळ' हे गाणं गणपतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. सध्या बॉलिवूडमध्ये रीमिक्सचा काळ सुरू आहे. 'ढगाला लागली कळ' या मराठमोळ्या गाण्याला वेगळं रूप देण्यात आलं आहे. अभिनेता आयुषमान खुराना चित्रपटात वेगळ्या थाटणीच्या भूमिकेत झळकणार आहे. गाण्यमध्ये अभिनेता रितेश देशमुख पाहुणा म्हणून झळकणार आहे. तर रितेश शिवाय या गाण्यामध्ये आयुषमान आणि नुसरत भरूचा देखील थिरकताना दिसणार आहे.
 
गणपती मंडळात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तेव्हा गणेशोत्सवात 'ड्रीमगर्ल' चित्रपटातील हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस पडणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत असून चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि आशीष सिंह करत आहेत. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.