शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2019 (15:23 IST)

मनातील भावनांना व्यक्त करणारे 'एकदा पाऊस माझ्या घरी' हे गाणे प्रदर्शित

पाऊस हा ऋतू जवळ जवळ सर्वांनाच आवडतो. मनातील अनेक भावनांना वाट मोकळा करून देणारा पाऊस हा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. त्यामुळेच की पावसावरील अनेक गाणी खूप प्रसिद्ध झाली. पाऊस पडत असताना ही गाणी ऐकली की मन खूप प्रसन्न होते. असंच मनाला प्रसन्न करणारे ' एकदा पाऊस माझ्या घरी हे गाणे' आज प्रदर्शित झाले आहे. संगीतकार अभिजित जोशी यांनी संगीतबद्ध केलेले व टाइम्स म्युझिकने प्रस्तुत केलेले हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवणाऱ्या सावनी रविंद्र या गायिकेने गाण्याला स्वरबद्ध केले आहे. गाण्याचे व्हिडिओ दिग्दर्शन तरूण दिग्दर्शक जागेश्वर ढोबळे यांनी केले आहे. हिमानी बल्लाळ या नवोदित अभिनेत्रीवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्याचे चित्रीकरण मध्य प्रदेशमधील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पेंच अभायारण्यात केले आहे. आजवर अभिजित जोशी यांनी मराठी सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्यांनी प्रत्येक गाण्यात आपल्या संगीताचे वेगळेपण दाखवून दिले आहे. भाग्यश्री जोशी-महाले लिखित ' एकदा पाऊस माझ्या घरी' हे गाणे प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही.