गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (12:33 IST)

दिलीप कुमार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक दिलीप कुमार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी चर्चेत येत आहे. बातमीनुसार दिलीपकुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.
 
दिलीपकुमार यांना रूटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पूर्वीही त्यांना श्वासोच्छ्वासाच्या अडचणीमुळे या रुग्णालयात दाखल करण्यात आलेहोते.
 
तपासणीदरम्यान दिलीप कुमारच्या फुफ्फुसांच्या बाहेर द्रव जमा झाल्याचे निदर्शनास आले, उपचारानंतर ते लिक्विड काढून टाकण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते.
दिलीपकुमार यांची पत्नी सायरा बानो त्यांची खास काळजी घेते.दिलीपकुमार यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ती चाहत्यांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती देत ​​राहते.