1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 6 जून 2021 (13:34 IST)

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

मुंबई : 98 वर्षाचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होता तसेच त्यांचे रुटिन चेकअप करायचे असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली.त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना आज सकाळी 8 :30 वाजता मुंबईतील खार येथील  हिंदुजा रुग्णालयात दाखल केले आहे.ही माहिती त्यांची पत्नी सायरा बानू यांनी दिली.हे नॉन कोव्हीड रुग्णालय असून दिलीपजींच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या असून त्यांच्या वर उपचार सुरु केले आहेत.आपण त्यांच्या साठी प्रार्थना करा की,ते लवकर बरे होवोत. 
 
गेल्या डिसेंबर 2020 पासून दिलीप कुमार अस्वस्थ असून त्यांची प्रकृती नाजूक आहे.गेल्या काही दिवसापासून त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे.आज त्रास वाढल्यामुळे त्यांना सकाळीच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वयोमानाने त्यांची प्रतिकारक शक्ती कमी झाली असून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे चाहत्यांना सांगितले आहे.