1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 4 जून 2021 (19:30 IST)

यामी गौतम विवाह बंधनात अडकली

फोटो साभार फेसबुक 
बालीवूडची महान अदाकारा यामी गौतम आज विवाह बंधनात अडकल्याची गोड बातमी थोड्यावेळा पूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना दिल्याचे समजत आहे.

यामी गौतमने उरी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी लग्न केले. सध्या कोरोनाच्या कालावधीत चित्रपट श्रुष्टीतील अनेक कलावंताने लग्न केले असून त्यात यामी गौतमचे नाव देखील समाविष्ट झाले.या पूर्वी कोरोनाकाळातच  वरून धवन हे देखील आपल्या मैत्रिणी नताशा दलाल यांच्याशी विवाहबद्ध झाले. 

यामीने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकलेले असून त्या लग्नाच्या जोड्यात खूप सुंदर दिसत आहे.यामीचे फॅन्स त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छाचा वर्षाव करीत आहे.यामी ने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की लग्नाचा फोटो शेअर करताना यामी म्हणाली की, "तुझ्यामुळे मी प्रेम करायला शिकले आहे. कुटुंबीयांच्या आशिर्वादाने आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत.हा लग्न सोहळा खूप लहान पद्धतीने केला असून खासगी लोकांसह या आनंदाचे क्षण आम्ही आमच्या कुटुंबियांसह साजरे केले. 

यामी गौतमने आदित्य धर दिग्दर्शित 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक'या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात विकी कौशल मुख्य  भूमीकेत होते.लोकांनी या चित्रपटाला चांगलेच प्रतिसाद दिले.जेव्हा पासून आदित्य आणि यामी यांच्या नात्याला वेगळे वळण लागले.आणि ते आज लग्नाच्या बंधनात अडकले.