1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ऐतिहासिक भूमिका यापुढे साकारणार नाही : दीपिका

dipika padukon
करणी सेनेच्या धमक्या, जाळपोळ, आंदोलने या पार्श्वभूमीवर अखेर 'पद्मावत' प्रदर्शित झाला खरा परंतु, अभिनेत्री दीपिका पदुकोणने या सगळ्याचा चांगलाच धसका घेतला आहे. 'यापुढं कुठलीही ऐतिहासिक भूमिका साकारणार नाही', असे तिने जाहीर केले.

'पद्मावत'च्या यशानंतर एका सोहळ्यात दीपिकाला काही पत्रकरांनी भविष्यात अशा ऐतिहासिक भूमिका साकारणार का असा प्रश्न विचारला. क्षणाचाही विलंब न करता तिने नकारार्थी मान हलवली. देशातले वातावरण पाहता यापुढे ऐतिहासिक भूमिका साकारणार नाही, असे तिने स्पष्ट केले.