सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2024 (10:09 IST)

Do Aur Do Pyaar Teaser: दो और दो प्यार' चा टीझर रिलीज, विद्या बालनची बोल्ड स्टाईल दिसणार

Do Aur Do Pyaar
विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांच्या आगामी 'दो और दो प्यार' या चित्रपटाचा टीझर  रिलीज झाला आहे. टीझर खूपच मजेशीर आहे. यामध्ये विद्या खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. त्यांचा एक किसिंग सीनही आहे. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
 
दो और दो प्यारमध्ये विद्या आणि प्रतीक व्यतिरिक्त इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. टीझरमध्ये विद्या बालन सेंथिल राममूर्तीसोबत दिसणार आहे. इलियाना आणि प्रतीक गांधी एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दिसतात. 'दो और दो प्यार' हे ॲप्लॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि एलिपसिस एंटरटेनमेंट निर्मित आहे.
 
शिर्षा गुहा ठाकुर्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा त्याचा डेब्यू चित्रपट आहे. 'दो और दो प्यार' 2017 च्या परदेशी चित्रपट 'द लव्हर्स'च्या कथेवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी चित्रपटातील सर्व स्टार्सचे फर्स्ट लूक शेअर करण्यात आले. आज या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
 
अप्लॉज एंटरटेनमेंट च्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून हा टीझर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत लिहिले आहे, 'या उन्हाळ्यात, थक्क करणारी, गोंधळात टाकणारी आहे. 
 
टीझरमध्ये विद्या बालन, प्रतीक, इलियाना आणि सेंथिल हे चारही स्टार्स खूप मस्ती करताना दिसत आहेत. टीझर पाहिल्यानंतर यूजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. 
 
Edited By- Priya Dixit