गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (09:38 IST)

‘भुलभुलैय्या३’ मध्ये विद्या बालन

vidya balan
मुंबई : २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि विद्या बालनचा ‘भुल भुलैय्या’ या सिनेमाचा आता तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये अभिनेत्री विद्या बालन हिची धमाकेदार एंट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
दरम्यान, विद्या बालन आणि कार्तिक आर्यन यांच्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाची कालच घोषणा झाली. कार्तिकने ‘भुलभुलैय्या३’ मध्ये मूळ मंजुलिका म्हणजेच विद्या बालनची एंट्री होणार असल्याची माहिती दिली आहे. विद्या बालन २००७ मध्ये आलेल्या ‘भुलभुलैय्या ’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मंजुलिकाच्या भूमिकेत दिसली होती. पण, त्याच्या सिक्वेलमध्ये अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यनने घेतली होती. तर तब्बूने मंजुलिका हे पात्र साकारत विद्या बालनची जागा घेतली.

विद्या बालनला आता पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.
 
 कार्तिकने या चित्रपटात विद्या बालन परतणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली, त्यानंतर अक्षय कुमारही यात दिसणार का याविषयी दिग्दर्शकांनी मोठा खुलासा केला आहे, सोबतच विद्यासोबत या सिनेमात अजून एका अभिनेत्रीची एंट्री होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor