शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (14:56 IST)

श्रद्धाचा डबल रोल

अभिनेत्री श्रद्धा कपूर वेगवेगळ कारणामुळे कायमच चर्चेत असते. आजही ती चर्चेत आहे तिच्या सोशल मीडियावरील एका नव्या पोस्टुळे. या पोस्टमधून तिने आपल्या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. श्रद्धाने आपला आगामी चित्रपट ‘चालबाज इन लंडन' या चित्रपटाबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. एका खास व्हिडिओमधून या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य असं की यात श्रद्धा प्रथमच दुहेरी भूमिकेत म्हणजे डबल रोलमध्ये दिसणार आहे. याचित्रपटाबद्दलची आपली उत्सुकता व्यक्त करताना श्रद्धा म्हणाली, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की निर्मात्यांनी ‘चालबाज इन लंडन' मधल्या भूमिकेसाठी माझा विचार केला. मी प्रथमच डबल रोलमध्ये दिसणार आहे आणि हे निश्चितच कोणत्याही कलाकारासाठी आव्हानात्मक असते. माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकताना भूषण आणि अहमद सरांना हा विश्वास होता की मी ही जबाबदारी पार पाडेन. पंकज सरांसोबत काम करणे ही माझ्यासाठी शिकण्याची संधी होती. दिग्दर्शन पंकज पराशर यांनी केले आहे. त्यांनीच श्रीदेवीची प्रमुख भूमिका असलेला मूळ ‘चालबाज' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
 
या चित्रपटाची घोषणा करणारा हा व्हिडिओ जुन्या ‘चालबाज'च्या आठवणी जगवणारा आहे. कारण यात त्या चित्रपटातल्या ‘ना जाने कहा से आयी है' या गाण्याचे संगीत आहे.