इब्राहिमची बॉलिवूडमध्ये एण्ट्री

ibrahim khan
Last Modified बुधवार, 7 एप्रिल 2021 (14:38 IST)
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक रणवीर सिंग आहे. रणवीर सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे निर्माता करण जोहरने त्याच्या ‘तख्त' या चित्रपटाचा प्रोजेक्ट पुढे ढकलला आहे. ‘तख्त' या चित्रपटात रणवीरसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री आलिया भट्ट आहे. रणवीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदा ‘गल्ली बॉय' चित्रपटामध्ये एकत्र दिसली होती. या दोघांचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता पुन्हा एकदा आलिया आणि रणवीरची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानकडे लागले आहे. इब्राहिम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इब्राहिम या चित्रपटात केवळ सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. त्याला फक्त चित्रपट निर्मितीची प्रक्रिया शिकायची आहे. त्याला लाँच करण्याची अद्याप कोणतीही योजना नाही. तो आता त्याचे शिक्षण पूर्ण करत आहे. इब्राहिमला अभिनेता व्हायचे आहे, पण त्याआधी त्याचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्यामुळे तो इतक्यात डेब्यू करणार नाही.

करण जोहरचे ‘धर्मा प्रोडक्शन' हा रॉम-कॉम चित्रपट तयार करणार आहे. करण स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. इब्राहिम अली खान या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 30 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, रणवीर सिंग ‘83' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1983 च्या वर्ल्डकपवर आधारीत आहे. यात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन
2017 सालातील ‘कोर्ट’ या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या सिनेमातील वीरा साथीदार ...

‘वेल डन बेबी’चा अभिनेता पुष्कर जोगने आपल्या प्रियजनांसोबत ...

‘वेल डन बेबी’चा अभिनेता पुष्कर जोगने आपल्या प्रियजनांसोबत साजरा केला ‘सुरक्षित’ गुढी पाडवा!
पुष्कर जोगसाठी हा गुढी पाडवा खास आहे कारण नुकताच अॅ मेझॉन प्राइम व्हिडिओवर त्याचा 'वेल डन ...

पुण्यातली बायको..नवऱ्याला...

पुण्यातली बायको..नवऱ्याला...
तरी मी तुम्हाला सांगत होते थोड थोड काम करणे सुरू ठेवा, सवय कायम राहू द्या कामाची! ...

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली ‘सुशांतपूर्वी ...

अभिनेत्री स्मिता पारिखचा नवा खुलासा, म्हणाली ‘सुशांतपूर्वी रिया चक्रवर्ती ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट’
बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती ...

सारा अली खानने मजेदार शैलीत 'दमादम मस्त कलंदर' गायले आहे, ...

सारा अली खानने मजेदार शैलीत 'दमादम मस्त कलंदर' गायले आहे, व्हिडिओ झाला व्हायरल
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. ती अनेकदा चाहत्यांसह ...