शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (14:30 IST)

जगातल्या मोठ्या कालाकारांच्या यादीत

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्येही दमदारकामगिरी केली. तिच्या या यशामध्ये अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘ब्रिटिशवॉग' मॅगझिनमध्ये जगातल्या 27 सर्वात मोठ्या स्टार्सच्या यादीमध्ये तिचेही नाव आले आहे. व्हिओला डेविस, रिझ अहमद, केट विनस्लेट, आन्या टेलर जॉय, टॉम हॉलंड आणि साशा बरॉन कोहेन यांच्यासोबत तिचेही नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. या मॅगझिनने तिला फीचर केलं आहे. प्रियंकाला तिच्या आवडीनिवडींविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिला हेही विचारण्यात आलं की, कोणता हॉलिवूड कलाकार तिला सगळ्यात जास्त आवडतो.
 
त्यावेळी तिने सोफिया लोरेन या इटालियन अभिनेत्रीचे नाव घेतले. तिच्यात मी मला पाहते, दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये, दोन वेगवेगळ्या देशांमध्ये काम करणारी, असं उत्तर तिने दिले. या व्यवसायापूर्वीच्या करिअर चॉईसबद्दल विचारलं असता ती म्हणाली,म ला ऍरोनॉटिकल इंजिनियर व्हायचे होते. मला विमानाचे फार आकर्षण होते. मला विज्ञान आवडायचे, गणितही आवडायचे असे सांगितले. प्रियंकाचा ‘द व्हाईट टायगर' हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट भरघोस यश मिळवत आहे. या वर्षीच्या बाफ्टा म्हणजेच ब्रिटिश अॅतकॅडमी फिल्म, टेलिव्हिजन, आर्ट पुरस्कारासाठी दोन विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. बाफ्टा पुरस्काराची नामांकने जाहीर झाल्यानंतर प्रियंकाने आनंदात काही टि्वटस्‌ केले होते. संपूर्ण भारतीय कलाकार असलेल्या चित्रपटाला 2 नामांकनं मिळाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याने तिने सांगितले. प्रियंका सध्या ‘सीटाडेल', ‘टेक्स्ट फॉर यू' आणि ‘द मॅट्रिक्स 4' या कार्यक्रम –चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे.