शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 एप्रिल 2021 (15:42 IST)

जान्हवी करते ‘हेलन'ची तयारी

Janhvi prepares
जान्हवी कपूर सध्या धाकटी बहीण खुशी आणि सावत्रबहीण अंशुलाबरोबर लंडनमध्ये आहे. ती सध्या तिच्या आगामी सिनेमा ‘हेलन'ची तयारी करते आहे.
 
तिचा हा ‘हेलन' सिनेमा मल्याळमधील राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा हेलनचा हिंदी रिमेक असणार आहे. मथुकुटी झेविरच्या डायरेक्शनखाली तयार होणार्या ‘हेलन'मध्ये जान्हवी एक साधीसुधी, काम करणारी मुलगी असणार आहे. काही अपघातामुळे ती एका सुपर मार्केटमधील फ्रिझरमध्ये अडकते आणि तिला तिथे लॉक व्हावे लागते, अशी या सिनेमाची कथा आहे.
 
शून्याच्या खालील तापानात राहायला लागल्याने जान्हवीला स्वतःच्या भीतीवर विजय मिळवून टिकून राहाचे आहे. या सिनेमाची तयारी म्हणून तिला फ्रिजमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेण्याची सवय करून घ्यायची आहे. ‘हेलन'ची निर्मिती बोनी कपूर स्वतः करणार आहे. इतक्या लहान वयात जान्हवीला सर्व्हायव्हर ड्रामा करण्याचे मोठे आव्हान पेलायचे आहे, असे बोनी कपूरने सांगितले. जर या संकटामध्ये काही चालबाजी केल्याचे प्रेक्षकांना लक्षात आले, तर ते हा सिनेमा बघणार नाहीत. म्हणून फ्रिजरमध्ये लॉक करण्याबाबत कोणतीही तड जोड केली जाणार नाही, असेही बोनी कपूरने सांगितले आहे.