बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024 (12:20 IST)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर ईडीचा छापा, पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित प्रकरण

Shilpa Shetty Raj Kundra News : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या प्रकरणात पुन्हा एकदा अडचणी वाढल्या आहे. ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला असून दाम्पत्याच्या घराची आणि ऑफिसची झडती सुरू आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहे. अभिनेत्रीच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीने अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला आहे. ईडीने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले आहे, त्यामुळे हे जोडपे चिंतेत आहे. अजून शोध सुरू असून, ईडी आपले काम करत आहे.  हा तपास मोबाईल ॲपद्वारे पॉर्न कंटेंट तयार करणे आणि प्रसारित करण्याशी संबंधित आहे. ईडीने मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 15 ठिकाणी छापे टाकले आहे.
 
पोर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 2021 पासून हे प्रकरण शांत झालेले नाही. शिल्पा आणि राज यांच्या घर आणि कार्यालयातच नव्हे तर त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरांचीही ईडीची झडती सुरू आहे. हे संपूर्ण प्रकरण पॉर्नोग्राफीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आहे. 
 
हे प्रकरण 2021 सालचे असून जेव्हा राज कुंद्रावर पोर्नोग्राफी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी ईडीने केलेला तपास मुंबई पोलिसांच्या 2021 च्या प्रकरणावर आधारित आहे. राज कुंद्रा याला 2021 मध्ये अटकही झाली होती. त्यांनी 63 दिवस तुरुंगातही काढले. पण, नंतर तो जामिनावर बाहेर आला.

Edited By- Dhanashri Naik