रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024 (09:37 IST)

महिला कर्मचारीकडे शारीरिक संबंधाची मागणी केल्यामुळे धुळ्यात अधिकाऱ्याला बेदम मारहाण

pitai
Dhule News: महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील महिला ग्रामसेवकाकडून शारीरिक संबंधाची मागणी करणे ग्राम विस्तार अधिकाऱ्याला महागात पडले. विनयभंगाचा आरोप करत महिलेने अधिकाऱ्याला त्यांच्या कार्यालयातच बेदम मारहाण केली. तसेच शारिरीक संबंधांची मागणी करणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्याला धडा शिकवताना महिलेने त्याला मारहाणच केली नाही तर त्याच्या चेहऱ्यावर काळे देखील फसले. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या प्रकरणामुळे सरकारी कार्यालयात मोठा गोंधळ उडाला आणि इतर कर्मचारी बघतच राहिले.
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शिंदखेडा पंचायत समिती कार्यालयात घडली असून, ग्राम विस्तार अधिकारी यांच्यावर महिला कर्मचाऱ्याशी शारीरिक संबंधाची मागणी करून तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. याबाबत पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, पण कोणतीही कारवाई न झाल्याने महिलेने स्वत: पुढाकार घेत अधिकाऱ्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
 
अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी पीडित महिलेने शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी शहाना भाऊ सोनवणे यांची मदत घेतली. यानंतर महिला आणि ठाकरे गटाच्या अधिकाऱ्यांनी थेट कार्यालय गाठून आरोपी अधिकाऱ्याला मारहाण केली. महिलेने आरोपीला केवळ बेदम मारहाणच केली नाही तर त्याचा चेहऱ्याला काळे देखील फासले. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकारीयांना मारहाण केल्यानंतर महिलेने त्यांना ओढत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात नेले आणि सर्व प्रकार सांगितला.