काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारातील माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे वयाच्या 89 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. ते फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांनी धुळे येथे राहत्या घरी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि धुळे (ग्रामीण) काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होत.
त्यांच्या निधनाने काँग्रेसच्या पक्षात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा आमदार कुणाल, विनय आणि मुलगी स्मिता आहे.शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
रोहिदास पाटील हे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते. ते विविध काँग्रेसच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आता त्यांचा मुलगा कुणाल या मतदारसंघातून आमदार आहे. त्यांच्या निधनावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नानापटोळे यांनी शोक व्यक्त केले आहे. तसेच राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Edited by - Priya Dixit