शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (21:04 IST)

एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या, ईडीने चौकशीसाठी पाठवले समन्स

Elvish Yadav
Elvish Yadav: बिग बॉस OTT 2' विजेता आणि  यूट्यूबर  एल्विश यादव अडचणीत आला आहे. अलीकडेच एल्विश यादवला सापाच्या विषाची तस्करी आणि रेव्ह पार्टी प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. आता ईडीने एल्विश यादवला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
 
सापाच्या विष प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने एल्विशला नोटीस बजावली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा गौतम बुद्ध नगर पोलिसांनी नोंदवला होता. ईडीने 8 जुलै रोजी एल्विशला पहिल्यांदा बोलावले. पण युट्युबरने तो परदेशात असून त्याला काही दिवसांचा वेळ हवा असल्याचे सांगितले होते.
 
ईडीच्या लखनौ युनिटने एल्विश यादवला 23 जुलै रोजी परदेशातून परतल्यानंतर लगेच हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 8 जुलै रोजी ईडीने एल्विश यादवचा जवळचा सहकारी आणि हरियाणातील गायक राहुल यादव उर्फ ​​फाजिलपुरिया याची सुमारे 7 तास चौकशी केली होती. राहुलला त्याच्या एका गाण्यात सापाचा वापर केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
 
एफआयआर नोंदवल्यानंतर गौतम बुद्ध नगर पोलिसांनी एल्विश यादव आणि इतर सात जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत 1200 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यात सापांची तस्करी कशी होते आणि पार्ट्यांमध्ये त्यांचे विष कसे वापरले जाते याचे वर्णन केले होते.

Edited by - Priya Dixit