बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (10:09 IST)

प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहलीच्या पतीचे निधन

अनेक हिट टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री नीलू कोहलीचे पती हरमिंदर सिंग कोहली यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. गुरुद्वारातून घरी परतल्यानंतर हरमिंदर बाथरूममध्ये गेले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.त्यावेळी घरात फक्त मदतनीसच होता. बराच उशीर झाल्यानंतर जेव्हा त्याने त्यांना पाहिले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते, त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
 
वृत्तानुसार, हरमिंदर शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास गुरुद्वारातून घरी परतले  यानंतर ते बाथरूममध्ये गेले आणि तिथेच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी घरात फक्त त्यांचा मदतनीस उपस्थित होता, बराच वेळ ते बाहेर आले नाही म्हणून त्याने डोकावून पहिले असता ते बेशुद्ध असल्याचे आढळले.
निलूच्या जवळच्या मित्राने सांगितले की त्यांना मधुमेहाचा आजार होता मात्र ते आजारी नव्हते. सर्वकाही अचानक घडले. त्यांचा मुलगा परदेशात असल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार रविवारी होणार असल्याचे सांगितले.
 
 प्रसिद्ध अभिनेत्री निलू कोहली यांनी 1999 साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'दिल क्या करे' मध्ये सहाय्यक भूमिका केली. नंतर त्यांनी 'निम्मो ते विम्मो' या पंजाबी मालिकेतही काम केले. त्यांनी 'जय हनुमान' या टीव्ही सीरियलमध्येही काम केले होते. याशिवाय ती 2022 मध्ये पिरियड ड्रामा चित्रपट 'जोगी'मध्ये दिसली होती. अभिनेत्रीने 'हिंदी मीडियम', 'हाऊसफुल 2' आणि 'रन' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit