1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जून 2024 (12:52 IST)

प्रसिद्ध फिल्ममेकर राज ग्रोवर यांचे निधन

Raj
Filmmaker Raaj Grover Passes Away: बॉलीवुड मधील प्रसिद्ध फिल्ममेकर राज ग्रोवर यांचे वयाचा 86 वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे पूर्ण फिल्म इंडस्ट्री मध्ये शोकांतिका पसरली आहे. 
 
Filmmaker Raaj Grover Passes Away: बॉलीवुड इंडस्ट्रीचे प्रसिद्ध फिल्ममेकर आणि निर्माता राज ग्रोवरयां च्याबाबदल वाईट बातमी आली आहे. त्यांनी 87 वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. या बातमीमुळे बॉलिवूड चित्रपट इंडस्ट्रीमध्ये शोकांतिका पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ग्रोवर यांचे निधन, 4 जून ला ओल्ड ब्रिज न्यू जर्सी (अमेरिका) मध्ये झाले. सांगितले जाते आहे की, फिल्ममेकर अनेक वर्षांपूर्वी भारत सोडून अमेरिका मध्ये राहत होते. मध्ये मध्ये ते भारतात यायचे.  राज ग्रोवर ने फिल्म इंडस्ट्री मध्ये धर्मेंद्र, विनोद खन्ना आणि परवीन बॉबी सारखे अनेक दिग्गज स्टार्स सोबत काम केले आहे. 
 
मृत्यूचा खुलासा नाही- 
राज ग्रोवर यांचे निधन कसे झाले हे अजून अद्याप समजले नाही. सांगितले जाते आहे की अभिनेत्याचा मृत्यू चनक झाला आहे, ज्यामुळे त्यांचे कुटुंबीय धक्क्यात आहे. त्यांचा एक  डायलॉग खूप फेमस होता. ज्यामध्ये ते म्हणायचे, ‘ग्रोवर नैवर ओवर’ राज ग्रोवर हे खूप दयाळू होते. 
 
या स्टार्स सोबत केले आहे काम 
राज ग्रोवर बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये धर्मेंद्र, परवीन बॉबी, राखी आणि विनोद खन्ना सारख्या मोठ्या स्टार्स सोबत केले होते. त्यांनी बनवलेले चित्रपट  ठिकाना आणि ताकत खूप हिट झाले होते. याशिवाय त्यांनी अनिल कपूर, स्मिता पाटिल आणि अमृता सिंह सोबत चित्रपट बनवलेत. 
 
लेखक होते राज ग्रोवर
फिल्ममेकर आणि प्रोड्यूसर होण्यासोबत राज ग्रोवर फेमस लेखक देखील होते. त्यांनी ‘द लेजेंड्स ऑफ बॉलीवुड’ नावाचे एक पुस्तक लिहले होते. सांगितले जाते आहे की, त्यांना खूप वेळापासून आजार होता.