Dharma Sangrah
✕

प्रसिद्ध मल्याळम अभिनेते इनोसंट यांचं निधन

Updated: सोमवार, 27 मार्च 2023 (10:07 IST)
 
अभिनेत्याची तब्येत काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यांना याआधी कॅन्सर झाला होता, ज्यातून त्यांनी ही लढाई जिंकली होती, मात्र श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे त्यांना 3 मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी, 26 मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कोची व्हीपीएस रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अॅलिस आणि मुलगा सॉनेट असा परिवार आहे.
 
अभिनेत्याचे अनेक अवयव निकामी झाले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अभिनेता काही वर्षांपूर्वी कर्करोगाने त्रस्त होता, परंतु 2015 मध्ये त्याने या आजारातून मुक्त झाल्याचे जाहीर केले. त्यांनी त्यांच्या 'लाफ्टर इन द कॅन्सर वॉर्ड' या पुस्तकात कर्करोगाशी केलेल्या लढाईबद्दल सांगितले.
 
या अभिनेत्याने पृथ्वीराज सुकुमारन यांच्या 2022 मध्ये आलेल्या 'कडूवा' चित्रपटात शेवटचे काम केले होते. पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 700 हून अधिक चित्रपट केले. ते 12 वर्षे मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष होते. मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. याशिवाय त्यांनी खलनायकाची भूमिकाही साकारली होती. 
 
 
Edited By- Priya Dixit 

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख