प्रसिद्ध छायाचित्रकार-अभिनेत्याचे वयाच्या 53 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध मल्याळम छायाचित्रकार आणि अभिनेते राधाकृष्णन चकयत यांचे शुक्रवार, 23 मे 2025 रोजी वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले. ते मल्याळम चित्रपट आणि छायाचित्रणातील एक आदरणीय नाव होते. राधाकृष्णन यांनी 'चार्ली' चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली, परंतु मूळतः ते त्यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणासाठी अधिक प्रसिद्ध होते. ते पिक्सेल व्हिलेजचे संस्थापक देखील होते .
त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले.यांच्या निधनाची बातमी पिक्सेल व्हिलेज टीमने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. टीमने पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आमचे प्रिय मार्गदर्शक, मित्र आणि प्रेरणास्थान राधाकृष्णन चकयत यांच्या निधनाची घोषणा आम्ही अत्यंत दुःखाने करत आहोत.
आमच्या छायाचित्रण प्रवासात ते एक मार्गदर्शक होते. त्यांनी आम्हाला कॅमेऱ्यातून जग पाहण्याची दृष्टीच दिली नाही तर त्याचा आत्मा कसा टिपायचा हे देखील शिकवले.
आम्ही त्यांच्या आठवणी जपत राहू आणि त्यांनी आपल्या सर्वांसोबत उदारतेने शेअर केलेला प्रकाश पुढे नेऊ."
Edited By - Priya Dixit