शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (15:27 IST)

फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला

4 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आज म्हणजेच 19 फेब्रुवारीला फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर विवाह बंधनात अडकले. फरहान आणि शिबानीच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे ज्यामध्ये वधू आणि वर खूप गोंडस आणि आनंदी दिसत आहेत.
 
वयाच्या 48 व्या वर्षी फरहानने पुन्हा एकदा 41 वर्षीय प्रेमिका शिबानी दांडेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. दुसरीकडे फरहानने या खास प्रसंगी स्वत:साठी काळ्या रंगाचे आउटफिट निवडले.
 
शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांचे लग्न जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर होणार आहे. दोघांनीही आपले लग्न अगदी साधेपणाने करायचे ठरवले होते, त्यामुळे त्यांनी ते पूर्णपणे खाजगी ठेवले आहे. या लग्नाला केवळ 50 लोक उपस्थित होते.