शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (15:45 IST)

पोलिसांना अपशब्द वापरल्याने अभिनेत्रीला अटक केले

अभिनेत्री काव्या थापरला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या वर दारू पिऊन गाडी चालवण्याचा आणि एखाद्या व्यक्तीला गाडीने धडक देण्याचा आरोप आहे. पोलिसांनी अभिनेत्रीला थांबवल्यावर तिने पोलिसांशी हुज्जत घातली आणि अपशब्द वापरले. सध्या त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
 
काव्या प्रामुख्याने साऊथच्या चित्रपटांमध्ये दिसते. थापर यांचा जन्म 20 ऑगस्ट 1995 रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांनी बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे.

काव्या पहिल्यांदा तत्काळ या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. अनेक मोठ्या ब्रँडसाठी त्यांनी जाहिराती केल्या आहेत. तिचा पहिला तेलगू चित्रपट  2018 मध्ये प्रदर्शित झाला. काव्या तिच्या हॉट फोटोशूटसाठी ओळखली जाते. ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली.