शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (15:26 IST)

माधुरी दीक्षितच्या निळ्या रंगाच्या साडीची किंमत जाणून घ्या..तुमही करु शकता कॅरी

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या सौंदर्य आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. माधुरी आपल्या स्माईलने देखील चाहत्यांचे मने घायाळ करत असते. नुकतीच माधुरी जांभळ्या रंगाच्या साडीत दिसली, या साडीची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
 
अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर निळ्या-जांभळ्या रंगाच्या साडीत फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीची ही साडी पाहून सर्वांच्या नजरा अभिनेत्रीवर खिळल्या आहेत. पण ही साडी सर्वसामान्यांच्या बजेटच्या पलीकडची आहे.
 
माधुरीने ही सुंदर साडी सिल्व्हर आणि व्हायलेट डिटेल्समध्ये भरतकाम केलेल्या मिड्रिफ-बेअरिंग स्लीव्हलेस ब्लाउजसह कॅरी केली आहे. तिने सिल्व्हर आणि ब्लू चोकर, इअर स्टड्स, अंगठ्या आणि बांगड्यांसह तिचा लुक दिला आहे. फॅशन स्टायलिस्ट अमी पटेलने हे स्टाइल केले आहे.
 
जर तुम्हाला धक धक गर्लची जामुनी वेलवेट साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करायची असेल, तर तुम्हाला आधी तिची किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. ही साडी ऑनलाइन खरेदी करू शकता.
 
माधुरी दीक्षितची ही उत्कृष्ट कामाची साडी तोराणी वेबसाइटवर उपलब्ध आहे, जिथून तुम्ही ती खरेदी करू शकता. तुम्ही या साडीची एकूण किंमत 1,15,500 रुपयांना खरेदी करू शकता. माधुरीच्या रंगाच्या साडीचा पल्लू मखमली सिल्कचा आहे आणि बाकीची साडी नेटची आहे.