रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (14:34 IST)

मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. कोट्टायम प्रदीप यांच्या आकस्मिक निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी माया आणि दोन मुले असा परिवार आहे. पृथ्वीराज सुकुमारन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. गुरुवारी पहाटे अभिनेत्याला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
 
2001 मध्ये अभिनय पदार्पण
कनिष्ठ कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रदीपने 2001  मध्ये इव्ही ससी दिग्दर्शित 'ई नाडू इनले वारे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. विनयथंडी वरुवाया, आडू, वादक्कन सेल्फी, कट्टापनायले रितिक रोशन, थोपपिल जोप्पन आणि कुंजीरमायनम हे त्यांचे काही महत्त्वाचे चित्रपट होते.
 
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला
अभिनेत्याचे चाहते आणि सेलिब्रिटी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांचे नाव प्रदीप केआर असले तरी ते कोट्टायम प्रदीप या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी बहुतांश चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या. त्यांनी आतापर्यंत सुमारे 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटातील विविध भूमिकांसाठी प्रदीपला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला.