मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (13:23 IST)

चित्रपट 120 बहादुरचे शूटिंग सुरु, फरहान अख्तर साकारणार मेजर शैतान सिंगची भूमिका

120 Bahadur
Photo - Twitter
1962 च्या  भारत -चीनच्या युद्धावर आधारित चित्रपट 120 बहादुरचे शूटिंग आजपासून सुरु झाले असून पहिले शेड्यूल लडाखमध्ये शूट केले जाणार आहे.

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरचे एक्सेल एंटरटेनमेंट ट्रिगर हॅपी स्टुडिओच्या सहकार्याने 120 बहादूर चित्रपट सादर होत आहे. या चित्रपटात मेजर शैतान सिंग आणि चार्ली कंपनी, 13 कुमाऊँ रेजिमेन्टच्या सैनिकांची कथा सांगण्यात आली आहे. 

हा लष्करी ऍक्शन चित्रपट 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित असून रेझान्गच्या लढाईपासून प्रेरित आहे. मेजर शैतान सिंग (PVC) च्या भूमिकेत फरहान अख्तर दर्शवणारे दोन रोमांचक मोशन पोस्टर रिलीज केले आहेत.
 
चित्रपटात फरहान अख्तर साकारणार मेजर शैतान सिंग(पीवीसी) ची भूमिका. मेजर शैतान सिंगने चिनी सैन्याला पळवून लावले. मेजरच्या शौर्याचे आणि त्यांच्या भूमिकेतील नेतृत्वाचे चित्रण प्रेक्षकांवर खोलवर परिणाम करेल आणि त्या वेळी भारताच्या सशस्त्र दलांनी केलेल्या बलिदानावरही प्रकाश टाकेल.चित्रपटाचा उद्देश मनोरंजन तसेच भारताच्या सशस्त्र दलांच्या शौर्याचा सन्मान करणे हा आहे.चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्यूल आजपासून लडाखमध्ये सुरू होत आहे.
Edited by - Priya Dixit