रविवार, 2 एप्रिल 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (08:27 IST)

पठाण चित्रपटाने एका आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रमही मोडला

'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने अवघ्या 7 दिवसात तब्बल 634 कोटींचा गल्ला जमवला असून, एका आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रमही मोडला आहे. शाहरुख खानने 4 वर्षांनंतर ‘पठाण’ चित्रपटातून पुनरागमन केले. हा चित्रपट शाहरुख खानच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे.
 
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर पठाणची घौडदौड सुरुच आहे. 25 जानेवारी रोजी रिलीज झाल्यापासून अवघ्या एका आठवड्यात या चित्रपटाने जगभरात 634 कोटींची कमाई केली आहे. 'पठाण' ने सातव्या दिवशी भारतात 23 कोटी रुपयांची कमाई केली असून हिंदीमध्ये 22 कोटी रुपये आणि डब व्हर्जनमध्ये 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सातव्या दिवशी परदेशातील कमाई 15 कोटी रुपये आहे.
 
7 दिवसात 'पठाण' ने $29.27 दशलक्ष म्हणजेच 238.5 कोटी रुपये परदेशातून कमावले आहेत, तर भारतात एकूण कलेक्शन 330.25 वर पोहोचले आहे. ज्यामध्ये चित्रपटाने हिंदीमध्ये 318.50 कोटी रुपये आणि डब व्हर्जनमध्ये 11.75 कोटी रुपये आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील पठाण चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor