1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (10:20 IST)

Filmfare Awards 2024: रणबीरला 'ॲनिमल'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, तर आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

गुजरातमधील गांधीनगर येथे 69 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. दोन दिवसीय उत्सव 27 जानेवारी 2024 रोजी सुरू झाला. रविवारी मुख्य श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रणबीर कपूरला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 'ॲनिमल' चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर आलिया भट्टला महिला वर्गात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टला हा पुरस्कार 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी देण्यात आला आहे.  
 
आलिया भट्टला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आलियाला स्टेजवर हा पुरस्कार दिला. शबाना आझमी यांना 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी महिला वर्गात सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. पुरस्कार सोहळ्यात शबाना आझमी अतिशय सुंदर दिसत होत्या. गुलाबी रंगाच्या साडीत त्या आल्या होत्या.
 
Edited By- Priya Dixit