रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 30 एप्रिल 2023 (09:53 IST)

फिल्मफेअर पुरस्कारांवरून अनुपम खेर यांची नाराजी

68 व्या फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा नुकतेच करण्यात आली. या पुरस्कारांबाबत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात गंगूबाई काठियावाडी आणि बधाई दो या चित्रपटांची कामगिरी चांगली झाली. मात्र, विवेक अग्निहोत्रींच्या अनुपम खेर अभिनित काश्मीर फाईल्स चित्रपटाला या पुरस्कारांमध्ये एकही पुरस्कार मिळाला नाही.
 
फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली.
 
“इज्जत ही महागडी गोष्ट आहे. छोट्या लोकांकडून ती मिळण्याची अपेक्षा ठेवू नका, असा या पोस्टचा आशय आहे. या पोस्टचा संबंध फिल्मफेअर सोहळ्याशी जोडून पाहिला जात आहे.