मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2023 (07:40 IST)

‘मिस्टर अँड मिसेस माही’चे चित्रिकरण पूर्ण

mr and mrs mahi
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जान्हवी लवकरच स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण अलिकडेच पूर्ण झाले असल्याची माहिती जान्हवीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
 
इट्स ए रॅप असे जान्हवीने स्वतःच्या पोस्टमध्ये नमूद पेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्माने केले असून याची निर्मिती करण जौहर करत आहेत. चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव दिसून येणार आहे. या दोघांचा परस्परांसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघेही ‘रूही’ या चित्रपटात एकत्र दिसून आले होते. मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटासाठी जान्हवीने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे.
 
धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनर अंतर्गत तयार होणाऱया चित्रपटात पहिल्यांदाच राजकुमार रावने काम केले आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. जान्हवी लवकरच ‘बवाल’ या चित्रपटात वरुण धवनसोबत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. जान्हवी याचबरोबर ज्युनियर एनटीआरसोबत ‘एनटीआर 30’ या चित्रपटात काम करणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor