शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2023 (16:43 IST)

Parineeti Raghav Engagement: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा या दिवशी होणार

बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचा खासदार राघव चड्ढायांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.हे अनेकदा सोबतच स्पॉट होतात. 

राघव- परिणितीच्या लग्नाची चाहते देखील वाट पाहत आहे. त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या पण त्या अफवा ठरल्या. आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली असून येत्या 13 मे रोजी यांचा साखरपूडा दिल्लीत होणार आहे.
 
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. खासदार राघव चढ्ढा याला परिणीती ही डेट करत आहे. हे दोघे बऱ्याच वेळा मुंबईमध्ये सोबत स्पाॅट देखील झाले आहे. .परिणीती व राघव लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
 
गेल्या  काही दिवसांपासून दोघे  एकमेकांना डेट करत असल्याचा चर्चा सुरु होत्या. आता या  चर्चेला विराम देत त्यांच्या साखरपुड्याची तारीख देखील समोर आली आहे. परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी साखरपुड्यासाठी शॉपिंग  करताना दिसली .    

या दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पण हे दोघे येत्या सहा  महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Edited By - Priya Dixit