बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (15:33 IST)

अखेर क्रिती सेननने सोडले लग्नाबाबत मौन; केले हे मोठे विधान

Bollywood girl Kriti Sanon
बॉलीवूड गर्ल क्रिती सेनन सध्या अनेक चित्रपटांमधून झळकत आहे. तिचा वरूण धवनसोबतचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘भेडिया’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निमित्ताने ती ‘बाहुबली’फेम अभिनेता प्रभास बरोबर दिसणार आहे. मनोरंजन विश्वात कोणाच्याही लव्ह स्टोरी लपलेल्या नाहीत. सध्या क्रिती आणि प्रभास यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. आजवर या दोघानींही त्यावर बोलणे टाळले होते. मात्र आता खुद्द क्रितीने यावर भाष्य केलं आहे. याद्वारे तिने अनके खुलासे देखील केले आहेत.
 
सध्या ‘आदिपुरुष’ हा चित्रपट वेगवेगळ्या गोष्टींनी चर्चेत आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभास आणि क्रितीची चांगली मैत्री झाली आणि याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं अशी चर्चा होती. ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीला यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. यावेळी उत्तर देताना तिने थेट प्रभासशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. झालं असं की, क्रितीला विचारलं गेलं, ‘टायगर श्रॉफ, प्रभास आणि कार्तिक आर्यन या तिघांपैकी तू कोणासोबत फ्लर्ट, डेट आणि लग्न करू इच्छितेस’. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “कार्तिक आर्यनसोबत फ्लर्ट करेन, टायगरला डेट करेन आणि प्रभासशी लग्न करेन.” इतकंच नव्हे तर ऑनस्क्रीन आम्ही दोघं खूप चांगले दिसतो, असंही ती म्हणाली.
 
याचवेळी वरुण धवनने देखील सिक्सर मारला. क्रितीच्या लव्ह-लाइफविषयी वरुण म्हणाला की, ती एका उंच ‘शहजादा’ला डेट करतेय, जो तिला परफेक्ट सूट होतो. असे म्हणत त्याने जवळजवळ प्रभासबाबत सूतोवाच केले. तर प्रभाससोबत काम करतानाचा अनुभव कसा होता, असं विचारलं असताना तिने सांगितलं, “शूटिंगदरम्यान मी प्रभासला हिंदी भाषा शिकवली, तर त्याने मला काही तेलुगू डायलॉग शिकवले.” ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने राम तर क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. याआधी प्रभासचं नाव अनेकदा ‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीशी जोडलं गेलं होतं. मात्र या दोघांनी वारंवार या चर्चा नाकारल्या होत्या.

Edited By- Ratnadeep Ranshoor