सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (09:26 IST)

गायक-संगीतकार राहुल जैन याच्याविरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर

मुंबई गायक-संगीतकार राहुल जैन याच्याविरुद्ध ३० वर्षीय महिला 'कॉस्च्युम स्टायलिस्ट'वर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. गायकाने हे आरोप फेटाळून लावले असून हे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. याआधीही गायक राहुल जैन याच्यावर बलात्कार आणि जबरदस्ती गर्भपात आणि फसवणूक अशा अनेक आरोपांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता.
 
ही घटना 11 ऑगस्ट 2022 ची आहे. एफआयआरचा संदर्भ देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, तक्रारदाराने ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या आपल्या जबानीत जैन यांनी इन्स्टाग्रामवर त्याच्याशी संपर्क साधला होता आणि त्याच्या कामाची प्रशंसा केली होती. सिंगरने कॉस्च्युम स्टायलिस्टला मुंबईतील अंधेरी येथील फ्लॅटवर बोलावलं. सामान दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला आपल्या बेडरूममध्ये नेलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने या सगळ्याला विरोध केला असता जैनने तिला मारहाण करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी राहुल जैनविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. गायकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.