गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (10:25 IST)

गौतम अधिकारी यांचे निधन

टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री गौतम अधिकारी (६७)  यांचं आज सकाळी निधन झालं. गौतम अधिकारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रवी आणि मुलगी उर्वी आहेत.

गौतम अधिकारी हे नवयुवकांसाठी अनुभवाचं भांडार होते. त्यांनी मराठी टीव्ही मालिकांच्या दिग्दर्शनात रेकॉर्ड केला. सर्वाधिक एपिसोड्सचं दिग्दर्शन करण्याचा विक्रम गौतम अधिकारींनी रचला.  त्यामुळेच त्यांचं नाव ‘लिम्का बुक’मध्येही नोंदलं गेलं.

महत्त्वाचं म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेल्या हिंदीतील सब टीव्ही या चॅनेलची स्थापना गौतम आणि त्यांचा भाऊ मार्कंड अधिकारी यांनी केली.