शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग

महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना   मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आगीने रौद्ररुप धारण केले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 
 
अग्निशमन दलाच्या बारा गाडया घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लांबून धुराचे लोट आकाशात जातान दिसत आहेत. बेहरामपाडयामध्ये झोपडपट्टीला आग लागण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा इथे झोपडपट्टीला आग लागली आहे. या परिसरात अनधिकृत बांधकाम मोठया प्रमाणावर असून अनेक झोपडया वांद्रे रेल्वे स्टेशनला लागून आहेत. 
 
अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल 4 ची आग म्हणून घोषित केले आहे. अग्निशमन दलाच्या बारा गाडयांसह तीन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सध्या तरी या आगीमध्ये कोणतिही जिवीतहानी झालेली नाही. वांद्रयातील भाभा आणि व्ही.एन.देसाईल हॉस्पिटलला अलर्टवर ठेवण्यात आले आहे.