1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

15 दिवसात वेदना नाहीश्या झाल्या नाही म्हणून गोविंदा आणि जॅकी श्रॉफवर 20 हजार दंड

मुझफ्फरनगर- अनेकदा फिल्मी कलाकार आणि क्रिकेटर प्रॉडक्ट्सची जाहिरात करत मोठमोठाले दावे करतात. प्रॉडक्ट तपासल्याशिवाय त्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे जाणून न घेता किती महाग पडतं जाणून घ्या. अशात एका प्रकरणात गोविंदा आणि जॅकी श्रॉफला कन्झ्यूमर कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे.
 
कोर्टाने दोन्ही कलाकारांवर  20 हजार रुपये दंड ठोठावला आहे. बातमीप्रमाणे जुलै 2012 मध्ये दोन्ही कलाकारांनी हर्बल तेलाची जाहिरात बघून अभिनव अग्रवाल नावाच्या व्यक्तीने आपल्या वडिलांसाठी वेदना कमी करणारे तेल खरेदी केले होते.
 
जाहिरातीत दावा करण्यात आला होता की ग्राहकांना फायदा न झाल्यास 15 दिवसात रुपये परत केले जातील. आता 15 दिवसात वेदना कमी न झाल्यामुळे कंपनीकडून रुपये परत मागवले जात आहे.