शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (09:56 IST)

‘थलाइवी’ चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘थलाइवी’ असं या बायोपिकचं नाव असून अभिनेत्री कंगना रणौत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. या पोस्टरवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा जाहीर केली आहे. २६ जून २०२० रोजी हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने खूप मेहनत घेतली आहे. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाला प्रोस्थेटिक मेकअप करावा लागला आहे.