शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (17:24 IST)

राकेश सावंत दिग्दर्शित 'मुद्दा ३७० जे अँड के' चित्रपटाचे पोस्टर आऊट

पृथ्वीचे नंदनवन आणि भारताचा मुकुट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरची ही कथा आहे. 'मुद्दा ३७० जे अँड के' हा चित्रपट १९४७ नंतर अनेकदा युद्धाचे रणांगण बनलेल्या काश्मीरच्या कधी नयनरम्य तर कधी रक्ताने माखलेल्या घटनांचे दर्शन घडवितो. जम्मू-काश्मीरने कधी बंडखोर बर्फ लाल झाल्याचे पाहिले आहे तर कधी सीमा ओलांडलेल्या दहशतवादामुळे काश्मीरच्या नयनरम्य सुंदर परिसरात बंदुकीची बारुद विखुरताना पाहिली आहे
 
ही कथा विस्थापित काश्मिरी पंडितांविषयी, त्यांच्या वेदना आणि त्यांच्या स्वतःच्या जन्मभूमीत निर्वासित बनलेल्या पीडितांबद्दल आहे. अनेक दशकांपासून काश्मिर कलम ३७० आणि ३५ (ए) सारख्या कायद्यांच्या जखमांनी वेढले आहे. परंतु तरीही या सुफियाना काश्मीरने बर्‍याच काळापासून तग धरत आपले अस्तित्व गमावत नाही, कदाचित यामुळेच येथे काश्मिरी पंडित दीनानाथ यांचा मुलगा सूरज आणि मुस्लिम मुलगी अस्मा यांच्या प्रेमाला अमरत्व प्राप्त होते.
 
ही कथा १९८९ चा काळ दर्शवते जेव्हा सुरज आणि आसमा स्वप्नांमध्ये त्यांच्या प्रेमाचे रंग भरत दहशतवादी सीमा पार करते. सूरज आणि अस्माच्या प्रेमामुळे रक्तपात होईल का? दिग्दर्शक राकेश सावंत यांचा 'मुद्दा ३७० जे अँड के', जम्मू-काश्मीरच्या राजकीय मैलाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरच्या भावना आशा आणि प्रेम नवीन वळण घेत असताना दिसून येणार आहे. 
 
'मुद्दा ३७० जे अँड के'
- दिग्दर्शक : राकेश सावंत
- निर्माते : डॉ. अतुल कृष्णा 
- सह-निर्माते : भंवर सिंह पुंडीर
- पटकथा: दिलीप मिश्रा आणि राकेश सावंत
- संवादः निसार अख्तर
- कलाकार :हितेन तेजवानी, मनोज जोशी, राज झुशी, जरीना वहाब, पंकज धीर, अनीता राज, मोहन कपूर, सुजाता मेहता, अंजन श्रीवास्तव, भंवर सिंह पुंदिर, शाबाझ खान, ब्रिज गोपाळ, मास्टर अयान आणि राखी सावंत, तसेच अंजली पांडे, आदिता जैन व तन्वी टंडन हे नवोदित कलाकार
- संगीतः सय्यद अहमद, साहिल मल्टी खान आणि राहुल भट्ट. 
- गीतः निसार अख्तर, सीमा भट्ट, शाहिद अंजुमन 
- गायकः आशा भोसले, शान, पलक मुंचल, असीस कौर, शाहिद माल्या, मुद्दसर अली, अविक दोजन चॅटर्जी