शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (10:53 IST)

जर्सीमध्ये शाहिद कपूरसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार रोमान्स करताना

सुपर 30 आणि बाटला हाऊस या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केल्यानंतर आता अभिनेत्री मृणाल ठाकूर शाहिद कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. जर्सी हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. ओरिजनल जर्सी चित्रपटाचे गौतम तिन्नानुरी हे दिग्दर्शक असून या रिमेकचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. 'जर्सी चित्रपटात शाहिदसोबत काम करायला मिळणार यामुळे खूप आनंदी आहे. ज्यावेळी मी ओरिजनल जर्सी चित्रपट बघितला तेव्हापासून मी खूपच एक्साइटेड झाली आणि या चित्रपटाचा भावनिक प्रवास बघून मी प्रेरित झाली.', असे मृणालने सांगितले. 
 
दिग्दर्शक गौतम यांनी या चित्रपटासाठी शाहिद कपूरशिवाय दुसरा कोणता उत्तम अभिनेता असूच शकत नाही, असे त्यांनी सांगितले. जर्सी हा एक स्पोट्‌र्स ड्रामा असणारा चित्रपट आहे. जर्सी हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा रिमेक असून दाक्षिणात्य अभिनेता नानीने या चित्रपटात क्रिकेटरची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. अल्लू अरविंद, अमन गिल आणि दिल राजूद्वारा निर्मित असणारा हा चित्रपट 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर हा नुकताच प्रदर्शित झालेल्या कबीर सिंहमध्ये दिसला होता. तर मृणाल ठाकूर ही बाटला हाऊसध्ये दिसली होती.