मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (14:21 IST)

गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज,चाहत्यांचे हात जोडून व्यक्त केले आभार

अभिनेता गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर त्यांनी मीडियाचे आणि चाहत्यांचे हात जोडून आभार मानले. ते म्हणाले, मला सर्वांचे आभार मानायचे आहे. माझ्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्यांचे मनापासून आभार. मी आता बरा  आहे आणि सुरक्षित आहे. 
 
मंगळवारी राहत्या घरी त्यांच्या पायाला चुकून  स्वत:च्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागली. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज त्यांना डिस्चार्ज मिळाला असून चार दिवसांनी ते घरी परतत आहेत. अभिनेत्याला व्हील चेअरवर बसवून बाहेर आणण्यात आले. यादरम्यान तो हसत-हसत चाहत्यांना भेटले.
त्यांना पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांच्याकडे त्यांनी आभार व्यक्त करत प्रेम दर्शवले. या वेळी ते भारावून गेले. 
डॉक्टरांनी गोविदा यांना सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. 
Edited by - Priya Dixit