गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 10 जुलै 2021 (14:51 IST)

हरभजन सिंग दुसर्‍यांदा बाबा झाला, अभिनेत्री पत्नी गीता बसरा यांनी मुलाला जन्म दिला

बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग यांच्या घरी एक छोटासा पाहुणा आला आहे. गीताने मुलाला जन्म दिला आहे. क्रिकेटपटू हरभजनने ट्विटरच्या माध्यमातून दुसर्‍यांदा वडील होण्याचा आनंद सामायिक केला आहे.
 
आपला आनंद सामायिक करताना हरभजनने ट्विटरवर लिहिले की, 'निरोगी बाळाने आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल देवाचे आभार. गीता आणि मुलगा दोघेही स्वस्थ आहेत.
 
भज्जी यांनी पोस्ट करताच बॉलिवूड आणि चाहत्यांसह स्पोर्ट्समधील सेलेब्रिटीज त्यांचे अभिनंदन करत ट्विट करत आहेत. यापूर्वी या जोडप्यातून एक मुलगी आहे ज्याचे नाव हिनाया आहे. हिनायाचा जन्म 2016 मध्ये झाला होता.
 
यावर्षी मार्च महिन्यात एका पोस्टच्या माध्यमातून गीताने दुसर्‍यांदा आई झाल्याची बातमी दिली होती. त्यांनी आपल्या पोस्टमधील कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'Coming soon.. July 2021'.
 
यानंतर बर्‍याच वेळा गीताने तिचा बेबी बंप दाखवत सोशल मीडियावर तिचा आनंद शेअर केला आहे. गरोदरपणात गीता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह होती.