शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (17:39 IST)

सलमान खान आणि त्याच्या बहिणीसह कंपनी Being Humanवर फसवणूकीचा आरोप

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याची बहिणसह त्याची कंपनी Being Human च्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण चंदीगढ मधील एका व्यापाऱ्याने यांच्या विरोधात फसवणूकीचा आरोप लगावला आहे. व्यापाऱ्याने आरोप लावत असे म्हटले की, शो रुम सुरु केल्यानंतर कंपनी दिल्लीहून सामान पाठवत नाही आहे. कंपनीची वेबसाइट सुद्धा बंद आहे. आता व्यापाऱ्याने सलमान खान, त्याची बहिण अलवीरा खान आणि बिंग ह्युमनच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सलमान खान, अलवीरा आणि बिंग ह्युमनचे सीईो प्रसाद कपारे, संतोष श्रीवास्तव, संध्या, अनूप, संजय रंगा, मानव आणि आलोक यांना समन्स धाडले आहेत.
 
व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर सलमान खान, अलवीरा खान अग्निहोत्री यांच्या व्यतिरिक्त कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना पोलिसांनी समन्स पाठवले आहेत. या सर्वांनी 10 दिवसात उत्तर देण्यास सांगितले आहे. व्यापारी अरुणने असे म्हटले की, सलमान खान याने त्यांना बिग बॉसच्या सेटवर बोलावले आणि कंपनीने सुरु केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले होते. सलमान खानने चंदीगढ मध्ये शोरुम सुरु करण्याबद्दल सु्द्धा बातचीत केली होती. तक्रारकर्त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा पोलिसांना पाठवली आहे. त्यांनी आरोप लगावला की, सलमान खान याने म्हटले होते तो शोरुमचे उद्घाटन करण्यासाठी येणार आहे. मात्र नंतर वेळ नसल्याने आला नाही.