बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (15:30 IST)

'त्या' नराधम मुलाला फाशीची शिक्षा

आईचे काळीज कापून खाणाऱ्या नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सुनील रामा कूचकोरवी असे क्रूर आणि निष्ठूर मुलाचं नाव आहे. आईच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर शरीराचे तुकडे नराधमाने फ्रिजमध्ये भरून ठेवले होते. कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यांमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सहा जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.  सत्र न्यायाधीश जाधव यांनी ही दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाची घटना असल्याचे नमूद करत करत आरोपी सुनील याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसेच 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
 
ऑगस्ट 2017मधील कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. आईने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून सुनील याने घरामध्येच आईची निर्घून हत्या केली. त्यानंतर सुनीलने धारदार शस्त्राने आईचे एक एक अवयव धडापासून वेगळे केले. इतकच नाही तर आईचं काळीज कापून ते भाजून खाण्याचा प्रयत्न देखील सुनील याने केला होता.