बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (23:36 IST)

शाहिद कपूरचे लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण

शाहिद कपूर लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. मात्र, या नव्या माध्यमाबाबत तो फारसा खूश नाही. मी ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत थोडा नर्व्हस आहे, असे तो म्हणाला आहे. शाहिद कपूर काही दिवसांनी एका वेबसीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. या सीरिजचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. मात्र, आपल्या सिनेमाच्या यशाप्रमाणेच आपल्याला वेबसीरिजमध्येही स्वीकारले जाईल अशी खात्री वाटत नसल्याचे त्याने सांगितले. 
 
ज्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर यश मिळते, त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरही यश मिळेलच अशी खात्री देता येत नाही. प्रेक्षकांना आपण दीर्घकाळासाठी दिसणार असल्याने त्यांना आपले काम आवडले आहे की नाही हे समजणे गरजेचे असते. किमान 8-10 एपिसोडसाठी प्रेक्षकांचे लक्ष खेचून घ्यावे लागणार असल्याने कथासूत्रदेखील तसेच दीर्घ मुदतीचे असायला हवे आहे. वेबसीरिजच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद टप्प्याटप्प्याने समजणार असल्याने त्याबाबत आपण नर्व्हस असल्याचे शाहिद म्हणाला.