EngvsNew: आठ वर्षांपूर्वीचं ट्वीट भोवणार? कसोटी पदार्पणात इंग्लंडच्या बॉलरवर माफीनाम्याची वेळ

Ollie Robinson
Last Modified रविवार, 6 जून 2021 (19:50 IST)
एकीकडे इंग्लंडसाठी कसोटी पदार्पणाचा आनंद मात्र दुसरीकडे आठ वर्षांपूर्वीच्या ट्वीटचं प्रकरणी माफी अशी फास्ट बॉलर ओली रॉबिन्सनची अवस्था झाली आहे.
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पहिली टेस्ट लॉर्ड्स इथे सुरू झाली.

27वर्षीय रॉबिन्सनला टेस्ट कॅप देण्यात आल्यानंतर काही तासात सोशल मीडियावर त्याने खूप वर्षांपूर्वी केलेले ट्वीट्स व्हायरल झाले. आक्षेपार्ह ट्वीटसाठी रॉबिन्सनने माफी मागितली.

"मी वर्णद्वेषी तसंच लिंगभेदी नाही. आठ वर्षांपूर्वीच्या या कृतीचा मला पश्चाताप झाला आहे. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. मी कोणताही विचार न करता बेजबाबदार वागले होतो. या गोष्टी समजण्याइतकं माझं वय नव्हतं. मी माफी मागतो", असं रॉबिन्सनने सांगितलं.
मात्र माफीनाम्यानंतरही हे प्रकरण शमण्याची चिन्हं नाहीत. रॉबिन्सनच्या आक्षेपार्ह ट्वीटनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघात निवडीकरता निकष बदलण्याच्या विचारात आहे. खेळाडूची निवड करताना सोशल मीडियावरील वर्तनाचा विचार करण्याची शक्यता असल्याचं इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांनी म्हटलं आहे.

ईसीबीतर्फे रॉबिन्सवर कारवाई केली जाऊ शकते. दुसऱ्या टेस्टमध्ये त्याला वगळण्यात येऊ शकतं.
आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने रॉबिन्सनचा या कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे या मालिकेत खेळत नाहीये.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रॉबिन्सनच्या नावावर 63 सामन्यात 279 विकेट्स आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि 7 अर्धशतकंही आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिली कसोटी लॉर्ड्स इथे तर दुसरी कसोटी बर्मिंगहॅम इथे होणार आहे.
आयपीएल स्पर्धेचा भाग असलेले बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स, मोईन अली, सॅम करन यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

IPL 2021: हैदराबाद संघात कोरोनाचा शिरकाव, टी नटराजन कोरोना ...

IPL 2021:  हैदराबाद संघात कोरोनाचा शिरकाव, टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह झाले
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील चौथा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय ...

IPLमध्ये RCB वगळता या संघासाठी विराट कोहली खेळू शकतात-डेल ...

IPLमध्ये RCB वगळता या संघासाठी विराट कोहली खेळू शकतात-डेल स्टेन ने भाकीत केले
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली या ...

IPL 2021, PBKS vs RR: राजस्थानने पंजाबला 2 धावांनी हरवले

IPL 2021, PBKS vs RR: राजस्थानने पंजाबला 2 धावांनी हरवले
इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 32 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा 2 धावांनी ...

AUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ...

AUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या ...

कोलकत्ता जिंकली रे

कोलकत्ता जिंकली रे
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामात खेळलेल्या 31 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ...